जिल्हा परिषद परभणी ग्रामपंचायत विभाग अंतर्गत विविध विकासकामांचे योग्य आढावा व मूल्यमापन करणेसाठी DREAMS प्रणाली सुरू करण्यात येत आहे.
सध्या ग्रामसेवक पारंपरिक पद्धतीने आपल्या विकासकामांचा अहवाल (रिपोर्ट) सादर करतात यामध्ये सुटसुटीतपणा व तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने कमीत कमी वेळामध्ये रिपोर्ट तयार व्हावा, सुसूत्रता निर्माण व्हावी या उद्देशाने DREAMS हे ॲप तयार केले असून या ॲपच्या वापरामुळे अतिशय कमी श्रमामध्ये ग्रामसेवकांना अहवाल सादर करता येणार आहे.