D-Pandhari

3 (8)

Business | 2.0MB

Description

नमस्कार…!
डी - पंढरी ... Everything about Digital - Pandharpur या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत...
मित्रहो...!!
अवघ्या महाराष्ट्राचे भक्तीपीठ आणि धार्मिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले सावळ्या विठुरायाचे ‘पंढरपूर’ हे भारताची दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.
असं हे आपलं जगप्रसिद्ध लाडकं पंढरपूर आजच्या इंटरनेटच्या हायटेक विश्वात मात्र फारसं ठळकपणे दिसत नाही.
आणि नेमकी हीच खंत मनात बाळगून आपलं पंढरपूर हे ‘डीजिटल पंढरपूर’ व्हावं तसेच जगभरातील लोकांना पंढरपूरबद्दल सर्व माहिती मिळावी याच उदात्त
दृष्टीकोनातून या वेबसाईट ची निर्मिती करण्यात आलेली आहे. वेबसाईटवर तुम्हाला पंढरपुरातील सर्व सरकारी निम-सरकारी कार्यालये, विविध शैक्षणिक संस्था,
स्वयंसेवी संस्था, सांस्कृतिक व क्रीडा मंडळे, दवाखाने, अत्यावश्यक सेवा, बँका व त्यांचे ATM सेंटर, या सर्व ठिकाणांचे जिओग्राफिकल लोकेशन्स,
त्यांचे अचूक पत्ते आणि संपर्क क्रमांक, बस आणि रेल्वेचे वेळापत्रक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबद्दलची माहिती, पंढरपूरचा इतिहास, संतपरंपरा,
इतर मंदिरे आणि खास आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली पंढरपुरातील प्रेक्षणीय पर्यटनस्थळे अशा विविध प्रकारची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
वरील सर्व माहिती अगदी घरबसल्या मिळण्यासाठी ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त आहे असे आम्हांस प्रकर्षाने वाटते.
वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी तसेच पर्यटनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आणि पर्यटक पंढरपूर नगरीस भेट देतात.
परंतु आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या धावत्या युगातही भाविकांना तसेच पर्यटकांना पंढरपूर बद्दलच्या अपुऱ्या माहितीमुळे किंवा अज्ञानामुळे अनेक अडचणीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते.
त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘डी-पंढरी’ ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त ठरेल खात्री आम्हांस वाटते कारण या माहितीचे संकलन खास पद्धतीने आणि अत्यंत अचूकपणे करण्यात आले आहे.
त्याच्या वापराने आपल्या वेळेची आणि श्रमाची बचत होऊन पंढरपूरचे आणखी एक हायटेक आणि ग्लोबल रूप पाहायला मिळेल यात तीळमात्र शंका नाही.
या वेबसाईटमध्ये आणखी सोई-सुविधा देण्याच्या हेतूने आपण केलेल्या सूचना नेहमीच स्वागतार्ह असतील...
आपली स्नेहांकित
टीम डी-पंढरी

Show More Less

What's New DPandhari

डी - पंढरी ... Everything about Digital - Pandharpur या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत...
For more http://dpandhari.in/index.php/en/page/about

Information

Updated:

Version: 1.0

Requires: Android 4.4 or later

Rate

Share by

You May Also Like